रेल्वेमधुन उतरले सहा प्रवासी..
मलकापूर : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून त्याचा फटका पूर्ण भारताला बसला आहे, सर्व काही ठप्प झाले होते आता पाचव्या लॉकडाउन काळ सुरु झाला असून काही प्रमाणात बससेवा व रेल्वे सेवा सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत.अडीच महीने प्रवासी सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील असंख्य नागरिक बऱ्याच परजिल्ह्यात, परप्रांतात अडकले होते, सुरु केलेली रेल्वे सेवेमुळे आज जिल्ह्यातील मलकापुर रेल्वे स्थानकावर हावड़ा मुंबई ही ट्रेन पोहोचली, या रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवासांची वैद्यकीय तपासणी करीत हातावर क्वारण टाइन चे शिक्के मारण्यात आले तसेच थर्मल स्क्रिनिग करण्यात आले व त्यानंतर रेल्वे स्टेशन बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली.