April 18, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

अज्ञात वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय इसम ठार

खामगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक इसम ठार झाल्याची घटना काल रात्री १२:३०च्या सुमारास घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थान समोर घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार नीलेश वसाडकर वय ३५ रा.घाटपुरी नाका हा काल रात्री जेवण झाल्यावर शतपावली करण्याकरता गेला असता जगदंबा देवी संस्थान मंदिराकडून परत येत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. सदर धडक इतकी जोरदार होती की निलेश याचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्याची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. सदर मृतदेहाचा घटनास्थळी पंचनामा करुन येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते.वृत्त लिहीपर्यंत पुढील कारवाई सुरू होती. मंदिराच्या जवळपास सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असल्याने त्यातून काही माहिती मिळते का त्यावरून पुढील कारवाई करण्यात येईल येईल असे पोलिसांनी सांगितले.निलेश वसाडकर अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व शांत स्वभावाचा होता त्याचा जाण्याने त्याच्या घरावर व मित्रपरिवार शोककळा पसरली आहे.

Related posts

सुटाळा बु ग्रामपंचायतची दिवाळी निमित्य आशा सेविकांना अनोखी भेट

nirbhid swarajya

शेगाव येथे धनगर आरक्षणासाठी निदर्शने; सरकारचा निषेध

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा तीव्र निषेध

nirbhid swarajya
error: Content is protected !!