खामगाव : येथील गोपाळनगर विभागातील योगीराज फ्लोअर मिल येथे छापा मारला होता. या ठिकाणी सोयाबीन बियाणे प्रक्रिया व पॅकिंग अनधिकृत सुरु असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये योगीराज फ्लोअर मिल याचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गोपाळ नगर इथे सुरू असलेल्या योगिराज प्रोसेसिंग प्लांट वर कृषी विभागाची चौकशी झाली, त्या मध्ये तिथे सुरू असलेल्या सचिन वराडे यांच्या PSM ऍग्री सोल्युशन चिखली येथील ही कंपनी असून या राजीष्ठेट कंपनी चे खामगाव इथे योगिराज फ्लोर मिलला ऍग्रिमेंट झालेले असून त्या नुसार बियाणे सफाईचे याठिकाणी काम सुरू होते. या मध्ये चौकशी सुरू असता सर्व कागदपत्रे कृषी विभागाला त्या ठिकाणी देण्यात आले होते. या व्यतिरिक्त योगीराज फ्लोर मिलचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे त्यांना क्लीनचिट देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गिरी यांनी दिली आहे.