शासन मान्यता प्राप्त तेरावी राष्ट्रीय कुडो स्पर्धा सोबत चौदावी आंतरराष्ट्रीय अक्षय कुमार कुडो स्पर्धा व कुडो फेडरेशन कप – तीन या स्पर्धा दि.२४.१०.२२ ते दि. ३०.१०.२२ दरम्यान बारडोली (गुजरात) येथे संपन्न झाल्या.या तिनही स्पर्धेमध्ये रुद्र निलेश चिंचोळकर,वय वर्ष ६ याने जोरदार खेळी करत ७ वर्ष वयोगटातील सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन तिनही सुवर्ण पदकला गवसणी घालून घवघवीत यश संपादन केले आहे.रुद्र चिंचोळकर याने सदरचे प्रशिक्षण अंबिका क्रिडा मंडळ खामगांव येथील प्रशिक्षक श्री राजेश सोनले सर यांचेकडुन प्राप्त केले असुन तो सध्या SSDV ज्ञानपीठ खामगांव येथे इयत्ता१ली मध्ये शिकत आहे.रुद्र चिंचोळकर याची तिसऱ्या जागतिक कुडो ज्युनिअर चॅम्पियनशिप करीता तसेच HOKUTOKI ६वी जागतिक कुडो चॅम्पियनशिप करीता निवड करण्यात आली आहे. हि स्पर्धा योयोगी नॅशनल स्टेडियम, २रे जिम्नॅशियम, टोकीयो, (जपान) येथे दि.१३ मे ते १४ मे २३ दरम्यान होवू घातली आहे.रुद्र ने आपल्या यशाचे श्रेय त्याचे आईवडील,आजोबा-आजी, त्याचे शिक्षक कोच श्री राजेश सोनले सर व कुडो असोसिएशन खामगांवचे अध्यक्ष श्री महेंद्र भाऊ रोहनकार यांना दिले आहे.खामगाव परिसरात रुद्र निलेश चिंचोळकर याचे सर्वत्र कौतुक होत आहे.रुद्रच्या या यशाबद्दल त्याचे खुप खुप अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
previous post