वाशीम : सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व खुळचट रुढी – परंपरा यांना फाटा देत नुकताच एक आगळा वेगळा ” शिव विवाह ” शिवधर्म पद्धतीने येथून जवळच असलेल्या चिखली खुर्द येथे सानंद पार पडला.
संभाजी ब्रिगेड चे माजी जिल्हा कार्याध्यक्ष तथा विद्यमान शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री गणेश शोभाबाई शेषराव अढाव व शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ वानखेडे यांच्या मामाची मुलगी शिवमती संध्या चंद्रभागा रामराव इढोळे यांचा हा विवाह आदर्श विवाह ठरला असुन जिल्हाभर या विवाहाच्या कौतुकाची चर्चा लोकांमध्ये व समाज माध्यमांमध्ये ऐकायला व पहायला मिळाली. या विवाहाचे वैशिष्टे म्हणजे ” छत्रपती शिवाजी महाराज यांचा ” दुसरा राज्याभिषेक दिन “, महात्मा फुले यांनी ” सत्यशोधक समाजाची स्थापना ” केलेला दिवस व मराठा सेवा संघाच्या प्रबोधन व परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून युगनायक पुरुषोत्तम खेडेकर यांनी ” शिवधर्म पीठाची ” स्थापना केली तो दिवसच मुहूर्त मानीत सोइच्या वेळेनुसार कोरोना महामारिच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.
जगातील एकमेव धर्म ज्याचे सर्वोच्च प्रेरणास्थान एक स्त्री म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत त्यांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले. नंतर सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. व ” शिवधर्माचे शिव पंचके ” म्हणल्या गेली. या विवाहात अक्षदारूपी धान्य वाया न घालता त्या एवजी पुष्पांचा वर्षाव नव दांपत्यावर करण्यात आला. याशिवाय मातृसात्तक पद्धतीत स्त्री ला सर्वोच्च स्थान असल्या कारणाने बोहल्यावर नवरीला उजवीकडे बसविण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिक मास व पौष मास लग्ना संबंधीत कार्यासाठी अशुभ मानलया जातो. परंतु या नव दाम्पत्याने व दोन्ही कडील घरच्या व पाहुणे मंडळीच्या तयारीने ” अधिक मासात ” हा विवाह करून ” शुद्ध हवा, पाणी, ऋतू ; हाची विवाहाचा मुहुर्तू ; बाकीचे झंजट फालतू ; मानतो आम्ही ” या ग्रामगीतेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वचनाचा प्रत्यय दिला. यावेळी शिवधर्म सेवक शिभप पंडीतराव देशमुख व जिजाऊ ब्रिगेडच्या अकोला विभागीय अध्यक्षा शिवमती संजिवनी बाजड यांनी विवाह सोपस्कार पार पाडले. तसेच विवाहाच्या दुसरया दिवशी ” शिवचरित्र व तुकारामांचे अभंग शतक ” ग्रंथ वाचन गणेश अढाव यांच्या ताई शिवमती विद्या संतोषराव गोटे यांनी नव दांपत्यासमोर केले. ” विवेकाने वागा ; होऊनी निर्भय; अशुभाचे भय; निर्बुद्धाना ” या तुकोबांच्या विचाराने कृती करीत या विवाहाने समाजात एक नवा आदर्श आणि नव पायंडा घातला एवढे मात्र निश्चीत.