October 6, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

अँम्बुलंसचे टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ५ व्यक्तींना चिरडले

शहरातील त्रिशरण चौकातील घटना

दोघांचा मृत्यू तर तिघांवर उपचार सुरू

बुलढाणा : येथील त्रिशरण चौकात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या घिसडी समाजाचे लोकांचे रस्त्याच्या कडेला पाल टाकून वीळे, कुन्हाडी, तवे अशी लोखंडी साहित्य तयार करून विकून पडोळकर व सोळंके कुटुंबीय आपली उपजीविका चालवत होते.१७ मार्चच्या रात्री १२ ते १ च्या दरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घातली. भरधाव वेगाने येणाऱ्या अँम्बुलंसचे टायर फुटल्याने सरळ अँम्बुलंस रस्त्याच्या कडेला कुटुंब झोपलेले असताना त्यांच्या अंगावरुन गेली. सदर अपघात इतका भीषण होता की,यामधे अनिल गंगाराम पडोळकर वय २९ याचा जागीच मृत्यू झाला तर बेबाबाई शेषराव सोळंके वय ३५ , आकाश अनिल पडोळकर वय ४ , शेषराव लक्ष्मण सोळंके वय ४०, मायाबाई अनिल पडळकर वय ३० हे सर्व रा.पारधीबाबा मंदिराजवळ चिखली जखमी झाले आहेत. यामधील मायाबाई अनिल पडळकर यांची प्रकृति गंभीर झाल्याने यांना अकोला येथे रेफर करण्यात आले मात्र त्यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Related posts

मलकापुर शहर केले सील

nirbhid swarajya

मनसे न.प. घंटागाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 199 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 39 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!