खामगांव : शेगांव – खामगांव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेज जवळ रात्रीच्या सुमारास रोड रोबरी झाल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी 2 अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या महितीनुसार शेगांव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय दिलीपराव बनारसे ३६ हे बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयातुन आपल्या दुचाकी वाहनाने घरी जात असताना शेगांव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेज जवळ रात्री ८ वाजताच्या सुमारास लघुशंके साठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्या पाठी मागून २ अज्ञात इसम येऊन त्याना पकड़ले व त्यांच्या जवळील रेडमी कंपनीचा मोबाईल,खिशातील काही पैसे व काही सामान असा एकूण १०,५०० रूपयाचा मुद्देमाल माल घेऊन पसार झाले. या प्रकरणी डॉ. विनय बनारसे यांनी शहर पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरुन २ अज्ञात चोरांविरुद्ध भादवी कलम ३९२,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात केला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र लांडे करीत आहे.
previous post