खामगांव : येथील सुप्रसिद्ध डॉक्टराच्या हॉस्पिटल मधे काम करणाऱ्या विठ्ठलाला खुद्द डॉक्टरानीच काही गावगुंड बोलाऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खामगांव येथील जलंब नाक्या वरील एका सुप्रसिद्ध डॉक्टर कडे काम करणाऱ्या कंपाउंडर ला खुद्द डॉक्टराने गावगुंड बोलाऊन मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. सदर डॉक्टर 2 दिवसाअगोदर त्या विठ्ठलाला प्रेमाने आपल्या हॉस्पिटल मधे बोलाऊन त्याला पहिले धमक्या दिल्या,तर एवढ्या वर न थांबता त्याने आधिपासुनच पैसे देऊन बोलावलेले गावगुंड यांनी त्याला बाहेर नेऊन मारहाण केली, आणि मारहाण केल्याचा वीडियो त्या गावगुंडानी डॉक्टराला पाठवला असल्याचे समजते. झालेले प्रकरण आपल्या अंगावर येऊ नये यासाठी डॉक्टर ने एका पोलिसाला हाताशी धरून त्या विठ्ठलावर प्रतिबंध कारवाई सुद्धा केली आहे. तसेच त्याला पोलीस स्टेशन ला नेण्यात आले होते व ठाणेदारानी सुद्धा त्याला प्रसाद दिला असल्याचे समजले आहे. मारहाण झालेल्या कंपाउंडर ला अकोला येथे भरती केले असल्याची चर्चा आहे.विठ्ठला च्या हाताला व पायाला जबर मार लागला असल्याचीही माहिती मिळाली आहे.विठ्ठलाने पोलिसात तक्रार केली असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.
ज्या डॉक्टराना लोक देव मानतात, जर लोकांना “लाइफ लाइन” देणाऱ्या कडूनच अश्या गोष्टी होत असतील तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे पहावे असे नागरिक खाजगीत चर्चा करताना दिसून येत आहे.या प्रकारणाकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
previous post