खामगांव : राज्यात कोरोनाचं संकट असताना कोणत्याही शाळेने पालकांकडून फी मागू नये. तसेच फीसाठी कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये, असे स्पष्ट निर्देश सरकार कडून देण्यात आले आहेत. मात्र तरीही खामगांव मधील अशातच खामगांव मधील शेगांव रोड वरील SSDV शाळेतून काही पालकांना व कोरोना वॉरियर्सना त्यांच्या मुलांची शाळेची फी भरण्यासाठी मॅसेज व कॉल येत आहेत.
तसेच फी 31 जुलै पर्यंत न भरल्यास त्यानंतर प्रति 5 रु दिवस दंड आकरण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. फी भरली नाही तर मुलांचे ऑनलाइन क्लासेस बंद करण्यात येईल असा दम सुद्धा शाळा प्रशासना कडून देण्यात येत आहे.या भूमिकेला अनेक पालक विरोध करतांना दिसून येत आहे.राज्यात कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर,नर्स हे मोठी जबाबदारी पार पाडतांना दिसत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय शालेय शिक्षण विभागाने पत्र काढून शाळांनी कुठल्याही पालकाकडून शैक्षणिक शुल्कासह इतर शुल्क घेऊ नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. या निर्देशाविरोधात जाणाऱ्या शाळा किंवा शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटलं आहे.
मात्र सरकारच्या या पत्राला न जुमानता काही शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्याचे संदेश पाठविण्यास सुरू केले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. काही पखाजगी शाळांकडून पुस्तक आणि स्टेशनरी खरेदी करण्यासाठी पालकांना संदेश पाठवले जात आहे. मात्र काही जागरुक पालकांनी शाळांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.