तेल्हारा : जि प शाळा काकणवाडा पंचायत समिती संग्रामपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री शंकरराव बहाकर (तेल्हारा) यांच्या सुपुत्राची वर्णी एमपीएससी परीक्षे च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रशासनात तहसीलदार पदी निवड झाली. शुभम चा शैक्षणीक प्रवास हा पहिली ते सातवी पिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेत, आठवी ते दहावी से.ब. विद्यालय तेल्हारा अकरावी व बारावी रा.ल.तो. महाविद्यालय अकोला. शुभम हा शालेय जिवनापासुनच मेहनती आणि अभ्यासु विद्यार्थी असल्याने १०-१२ वी मध्ये त्याला अनुक्रमे ९३ आणि ७२% टक्के मिळाले होते आणि पिईटी परीक्षेत १३६ गुण घेऊन गुरु गोविंदसिंग इंस्टीट्युट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथुन बिटेक ची पदवी घेतली. शुभमला हे घवघवीत यश दुसऱ्या परिक्षेत आले पहिल्या प्रयत्नात त्याला राज्यसेवा मुलाखती साठी फक्त १० गुण कमी पडले पण तरीही खचुन न जाता दुसरा प्रयत्न यशस्वी ठरवला आणि तहसीलदार पदाचा मानकरी झाला या यशाचे श्रेय शुभमने शिक्षणाच्या प्रवासात लाभलेले शिक्षक, आई वडील आणि अभ्यासात मदत करणाऱ्या मित्रांना दिले.
previous post