खामगांव : बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून सर्वात अधिक रुग्ण हे खामगांव मधे निघत आहेत.
कोरोनाच्या काळात दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. खामगांव पोलीस स्टेशन डीबी पथकातील 1 कर्मचारी तर SDPO पथकातील 1 कर्मचाऱ्यांला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यांच्या संपर्कातील 14 पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.यामधे sdpo पथकातील 2 कर्मचारी, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील 1 कर्मचारी तर खामगांव पोलीस स्टेशन मधील 11 कर्मचारी आहेत.मागील महिन्यात पि. राजा पोलीस स्टेशन मधील ठाणेदारासह कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी ते सर्व निगेटिव आले होते. याआधी जिल्ह्यातील 3 पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी पॉजिटिव आल्याने पोलीस स्टेशन सील करण्यात आले असून आता खामगांव शहर पोलीस स्टेशन सुद्धा सील करण्यात येते का ? अशी भीती निर्माण झाली आहे.
previous post