शेगाव : येथील रायली फैल येथे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाला एका घरात पैशाच्या हरजीतवर वरली मटका जुगार खेळत असल्याची गुप्त महिति पोलिसांना मिळाली. त्या महितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून १० जणांना ताब्यात घेऊन साहित्यसह २ लाख ४३ हजार ५२५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव येथील रायली फैल येथे एका घरात पैशाच्या हरजीतवर वरली मटका जुगार खेळत असल्याची गुप्त महिति उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. त्या महितीच्या आधारे पोलिसांनी घरावर छापा टाकला असता नंदकिशोर हजारीमल शर्मा वय ६७ वर्षे रा.लख्खपती गल्ली, प्रमोद कमलाकर पहुरकर वय ३२वर्षे रा.सवर्णा,सुधाकर प्रल्हाद बावसकर वय ४९ वर्षे रा. कुंभारवाडा, ज्ञानेश्वर विठ्ठल माटे वय ३३ वर्षे रा. आडसुळ, रामकृष्ण मोतीराम बढे वय ४५ वर्षे रा.सवर्णा, रामेश्वर पांडुरंग गावंडे वय ५० वर्षे रा. घोराडे नगर,दिनेश देवराम आंबिलकर वय ४७ वर्षे रा. ग.म. मंदिर पश्चिम गेट जवळ, माणिक रामकृष्ण सोळंके वय २८ वर्षे रा. सगोडा ह.मु. श्रीराम नगर, संतोष गोपाल सारवान वय ३५ वर्षे रा. रामदेवबाबा नगर, दुर्गेश विजय सावळे वय २५ वर्षे रा.असे एकुन १० जण उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाला पैशाच्या हारजीत वर वरली मटका नावाचा जुगार खेळताना व खेळवितांना रंगेहात मिळून आले.त्यांच्या कडून नगदी जुगाराचे नगदी २ हजार ५७५ व वरलीच्या चिठ्या, १० नग डॉट पेन ५० रु, ४६ नग मोबाईल हँडसेट कि.५९ हजार,६ नग मोटर सायकल कि. १ लाख ७५ हजार रु. कॅल्क्युलेटर, लेटरपॅड व इतर जुगार साहित्य कि. ६९ हजार रु.असा एकुण २ लाख ४३ हजार ५२५ रूपयाचा चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत ५०४/२०२० क ४,५नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे आदेशाने तसेच अपर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपुत व उपविभागिय पोलीस अधिकारी अमोल कोळी खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे पथकातील पो.उप.नि.कलीम बेग सलाम बेग,पो.ना. सुधाकर थोरात, अमित चंदेल, पो.कॉ. विशाल कोळी, म.पो.हे.कॉ. संध्या ताठरकर यांनी केली.