November 20, 2025
बातम्या

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे साहेबांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला. मी स्वर्गीय शारदाताईंच्या स्मृतींना वंदन करतो. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना श्री. राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता श्री. राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.

  • अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

Related posts

खामगाव कृउबास निवडणुकीत महाविकास आघाडी की बिघाड़ी

nirbhid swarajya

जिल्ह्यातील चार संशयित नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

nirbhid swarajya

Check Out Valve’s New VR Controller Prototype In Action

admin
error: Content is protected !!