पुणे : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या MPSC च्या जाहिरातीवरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संतापले आहेत. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत एनटी प्रवर्गासाठी जागाच उपलब्ध करून दिलेल्या नाही, असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पोस्टच्या जाहिरातीत एनटीसी आणि एनटीडीच्या जागा आरक्षणाप्रमाणे निघालेल्या नाहीत
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या च्या एन टी सी 24 आणि एनटीडीच्या 13 जागा निघणे अपेक्षित होते, मात्र एनटीसीला केवळ 2 जागा आणि एनटीडीला एकही जागा निघालेली नाही. याचा विद्यार्थ्यांनी निषेध केला आहे.जोपर्यत पूर्वीप्रमाणे आरक्षणा सहीत जागा निघत नाही तोपर्यंत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला स्थगिती द्यावी आणि नवीन जाहिरात शासनाने द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.