April 11, 2025
खामगाव

खामगाव न्यायालयात व्ही सी द्वारे नोंदविला पुरावा

खामगाव :खामगाव येथीलअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातलॉकडाऊननंतर प्रथमच व्हीसीद्वारेपुरावा नोंदविण्यात आला.२३ जून २०२० रोजी तब्बल तीनमहिन्यांनंतर पहिल्यांदा वि. अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर.डी. देशपांडे खामगाव यांनी बाललैंगिक अत्याचाराच्या अतिमहत्त्वाच्याप्रकरणात, प्रकरणातील तपासअधिकारी, श्रीमती रुपाली दरेकरसहायक पोलीस आयुक्त सोलापूरयांचा पुरावा व्हीसीद्वारे नोंदविला.त्याकामी अति. शासकीय अभियोक्तारजनी बावस्कार, आरोपीचे वकीलव्ही, वाय. देशमुख, न्यायालयीनकर्मचारी कनिष्ठ लिपिक प्रवीणखडसे, स्टेनोग्राफर धनंजय म्हात्रे,संगणक तंत्रज्ञ प्रशांत जोहरे, जितुसिंगबिल्लारे व स्वप्निल बोचरे यांचे विशेषसहकार्य लाभले.१७ मार्च २० रोजी वि. उच्चन्यायालयाचे कोविड १९ च्या धरतीवरआलेल्या आदेशानुसार कामकाजथांबले व कोरोना व्हायरसमुळेआलेल्या व्यत्ययामुळे थांबलेलापुरावा आज तब्बल तीन महिन्यानंतरपूर्ण झाला. वि. उच्च न्यायालयाच्याआदेशानसार लॉकडाऊनच्या काळातकेवळ अतिआवश्यक प्रकरण जसे कीजमानत अर्ज, रिमांड, इत्यादी वगळतासर्व न्यायालयीन कामकाज कोरोनाविषाणूचा प्रदुर्भाव टाळण्याच्याअनुषंगाने बंद होते आणि त्यामुळेप्रकरणातील पुरावा नोंदविण्याचेकामकाज थावलेले होते; परंतुदीर्घकालीन लाकडाऊन असल्यानेपूर्णत: हटवणे सध्या तरी शक्य नाही,म्हणून सर्व बाबींचा विचार करून वि.उच्च न्यायालयाने ८ जून २० पासूनन्यायालयीन कामकाज सकाळी१०.३० ते १.०० व दुपारी २.३० ते ५.३०असे दोन पाळ्यांमध्ये सुरु करण्याचेनिर्देश दिलेले आहे, तसेच शक्यतोवरफिर्यादी, आरोपी व पक्षकार यांनान्यायालयात न बोलवता व्हिडिओकान्फरंसीद्वारे पुरावा नोंदविण्याचेपरवानगी व तसे निर्देश वि. उच्चन्यायालयाने घालून दिले आहेत.त्यानुसारअतिमहत्त्वाच्याप्रकरणात पूर्ववत कामकाज सुरूकरण्यात आले.

Related posts

राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या ८६ व्या वर्षात पदार्पणानिमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन

nirbhid swarajya

एसटीला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी इंटकचे एसटी बचाव आंदोलन

nirbhid swarajya

एका दिवसात आठ हजार भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

nirbhid swarajya
error: Content is protected !!