खामगाव : कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून येथील कोविड केअर सेंटर साठी प्रशासनाच्यावतीने 38 खाजगी वैद्यकीय व्यावसायिक बी. एच .एम .एस अधिग्रहीत करण्यात आली आहे याबाबत असे की शासनाकडून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत तर कोरोना महामारीच्या च्या काळात अचानक बिकट परिस्थिती उद्भवल्यास किंवा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांना सुद्धा या काळात कामकाज करण्यासाठी जिल्हा वैद्यकीय अधीक्षक आणि प्रशासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आले आहे यामध्ये 38 डॉक्टरांचा समावेश या सर्वांच्या सकाळी सहा ते दुपारी दोन ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री दहा तसेच रात्री दहा ते सकाळी सहा तीन शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आले आहेत या सर्वांना जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची 14 जून रोजी नि .मा संघटनेसोबत झालेल्या सभेत ड्युटी मध्ये हलगर्जीपणा केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला उपरोक्त खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना काळात 50 लाखांचे विमा संरक्षण शासनाच्या वतीने देण्यात आल्या देण्यात आला असून गरज भासल्यास तिकीट सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या अनुषंगाने घाटपुरी मार्गावरील कोविड सेंटर समाज कल्याण वसतिगृह येथे तालुक्यातील वेगवेगळ्या येथे 38 खाजगी वैद्यकीय व्यवसायिक डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
previous post