संग्रामपूर : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि वेगळे काही तरी करण्याची इच्छा बाळगून कसोशीने प्रयत्न करणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील इंद्रायणी गोमासे यांना अखेर यश आले आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या असून आता त्या तहसीलदार होणार आहेत.
शिकून काय करायचं, घरचं तर सांभाळावं लागत हा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोण पण लग्न झाल्यावरही इंद्रायणी यांनी शिक्षणाच्या यशाचं शिखर गाठलं आहे. वडिलांकडे फक्त तीन एकर जमीन त्यात तीन बहिणी आणि एका भावाच्या शिक्षणाचं ओझं, मात्र इंद्रायणी यांच्या वडिलांनी मुलींचं शिक्षण थांबवलं नाही. शेती पिकवून त्यांनी मुलींचं शिक्षण व लग्न केले. इंद्रायणी यांच्या लग्नानंतरही पती सीआरपीएफ मध्ये छतीसगड येथील बस्तर येथे देशाची सेवा करीत आहेत बाकी सासरचे कुटुंब शेतकरी असल्यावरही त्यांच्या शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरूच ठेवलं. याच फलित म्हणजे इंद्रायणी यांनी कृषी पदविकेत 10 पुरस्कार पटकावले यात 5 सुवर्ण , 2 रजत तर 3 रोख पुरस्कार आहेत. कृषी पदवी मिळवून शासकीय कार्यालयात नोकरी मिळवली तर शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचू शकतील नाहीतर शेतीवर अनेक संशोधन केली जातात पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही याकरिता एवढ्यावरच न थांबता इंद्रायणी यांनी स्पर्धा परीक्षेचा पुणे येथून खाजगी शिकवण्यातून स्वतः अभ्यास करून राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली व यामध्ये उत्तीर्ण होऊन ओबीसी या प्रवर्गातून मुलींमध्ये 2 रा क्रमांक पटकावून आता त्या तहसीलदार होणार आहेत या सर्व गोष्टींचे श्रेय त्यांनी त्यांचे आईवडील,पती व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिले आहे. इच्छाशक्ती व मेहनत करण्याची जिद्द असली की सर्व शक्य आहे हे इंद्रायणी यांनी दाखवून दिले आहे.