खामगांव : खामगांवकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आमदार आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच पुढील २ ते ३ दिवसात खामगाव मध्ये COVID 19 टेस्टिंग लॅब सामान्य रुग्णालय खामगांव येथे सुरू होणार आहे. निर्भिड स्वराज्य ने सुद्धा या लॅब संबंधित वारंवार लाइव्ह च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. या लॅब चे संपूर्ण काम पूर्ण झालेले आहे व कोरोना टेस्टिंग मशीन देखील खामगाव येथे आली आहे. ही बाब सर्व खामगावकरांसाठी दिलासादायक आहे व आता मोठ्या प्रमाणावर खामगाव सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्टिंग होणार आहे.