April 18, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त किती कोरोना अहवाल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह?

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 200 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 161 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 39 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 34 व रॅपिड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 132 तर रॅपिड टेस्टमधील 29 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 161 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह अहवालामध्ये आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर : 36 महिला व 28 वर्षीय पुरूष, नांदुरा : पोलीस क्वार्टरमागे 42 वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द 17 वर्षीय पुरूष व 20 वर्षीय महिला. खालखेड ता. नांदुरा 56 वर्षीय महिला, चांदुर बिस्वा ता. नांदुरा 80 वर्षीय पुरूष, दे. राजा : 80 वर्षीय महिला, अहिंसा मार्ग 7 वर्षीय मुलगी, 1 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी 21 पुरूष, दुर्गापूरा 40 वर्षीय पुरूष, 37 वर्षीय महिला, शेगांव: दसरा नगर 10 वर्षीय मुलगा, 61 वर्षीय पुरूष, देशमुखपूरा 30 वर्षीय पुरूष, खामगांव : 38 वर्षीय पुरूष, 57 वर्षीय पुरूष, वाडी 48 वर्षीय पुरूष, बालाजी फैल 27, 58, 47 व 52 वर्षीय पुरूष, 44 व 51 वर्षीय महिला, फरशी रोड 45 वर्षीय महिला, रायगड कॉलनी 28 वर्षीय पुरूष, राठी प्लॉट 29 वर्षीय पुरूष, सिव्हील लाईन 10 वर्षीय मुलगा, 26 वर्षीय पुरूष, यशोदरा नगर 45 वर्षीय महिला, जळका भडंग ता. खामगांव : 65 वर्षीय पुरूष,सुटाळा खुर्द 74 वर्षीय महिला, भालेगांव ता. खामगांव 66 वर्षीय महिला, बुलडाणा : नक्षत्र अपार्टमेंट 54 व 76 वर्षीय महिला व 58 वर्षीय पुरूष, कोथळी ता. मोताळा : 82 वर्षीय पुरूष, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 39 रूग्ण आढळले आहे.
त्याचप्रमाणे आज उपचारादरम्यान बुलडाणा येथे गुळभेली ता. मोताळा येथील 47 वषीय पुरूष आणि जळका भडंग ता. खामगांव येथील 56 वर्षीय पुरूष रूग्णाचा खामगाव येथे मृत्यू झाला आहे.
तसेच आज 27 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत एका दिवसात सर्वात जास्त रूग्णांना सुट्टी आज देण्यात आली आहे. त्यामध्ये टिळक मैदान गजानन नगर चिखली येथील 57 वर्षीय पुरूष, शेगांव : सुरभी कॉलनी 58 वर्षीय महिला, 72 व 22 वर्षीय पुरूष, जमजम नगर 30 व 17 वर्षीय महिला, टिपू सुलतानपूरा 26 वर्षीय पुरूष,आळसणा ता. शेगांव 16 वर्षीय पुरूष, खामगांव :45 वर्षीय पुरूष, रेखा प्लॉट 40 वर्षीय पुरूष, सती फैल 47 वर्षीय पुरूष, शंकर नगर 30 वर्षीय पुरूष, दाल फैल 47 व 35 वर्षीय महिला, शेगांव रोड 30 वर्षीय महिला, घाटपुरी 21 व 48 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय महिला, पुरवार गल्ली 55 वर्षीय पुरूष, शिवाजी नगर 20 वर्षीय पुरूष, नांदुरा :45 वर्षीय पुरूष, रामनगर नांदुरा 33 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 25, 37 व 38 वर्षीय पुरूष, बुलडाणा : मिर्झा नगर 25 वर्षीय पुरूष आणि मूळ पत्ता उल्हासनगर मुंबई येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे.
तसेच आजपर्यंत 6033 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 353 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 353 आहे.आज रोजी 237 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 6033 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 742 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 353 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 367 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 22 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

‘सूर्यपुत्रा’ची कथा मोठ्या पडद्यावर

nirbhid swarajya

बाजार समिती मधील २ व्यापारी नॉट रिचेबल

nirbhid swarajya

हमाल व मापारी श्रमिक संघटनेने पुकारला दोन दिवस बंद

nirbhid swarajya
error: Content is protected !!