April 19, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 53 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 03 पॉझिटिव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 56 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 53 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा धा. बढे ता. मोताळा  येथील 9 वर्षीय मुलाचा आहे. तसेच हाश्मी नगर मलकापूर येथील 35 वर्षीय महिला व घासलेटपुरा नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूष संशयीत रूग्णाचे अहवालही पॉझीटीव्ह आले आहे. अशाप्रकारे आज 3 संशयीतांचे अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.    त्याचप्रमाणे आज 13 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. खामगांव कोविड रूग्णालयातून 34 वर्षीय पुरूष जनुना ता. खामगांव येथील रूग्णास सुट्टी देण्यात आली आहे. तसेच शेगांव कोविड रूग्णालयातून पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 65 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष व 18 वर्षीय तरूण रूग्णास सुट्टी देण्यात आली आहे. बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून पारपेट मलकापूर येथील 59 वर्षीय पुरूष, 43 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, 3 व 6 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी आणि डोणगांव ता. मेहकर येथील 20 वर्षीय महिलेला सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांनी आज घर गाठले आहे.       

 तसेच आतापर्यंत 2326 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 169 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 10 मृत आहे. आतापर्यंत 135 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 135 आहे.  सध्या रूग्णालयात 24 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.    तसेच आज 24 जुन रोजी 56 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 3 पॉझीटीव्ह, तर 53 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 30 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2326 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

आ.ॲड.आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमीत्त घरकुल लाभार्थ्यांचा सत्कार

nirbhid swarajya

अडकून पडलेल्या नागरिकांना घरटे जवळ करण्यासाठी एसटी सज्ज

nirbhid swarajya

महाराज नसतील परंतू महाराजांपेक्षा कमी नाहीत !

nirbhid swarajya
error: Content is protected !!