खामगाव : 2020 या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आज दिनांक 21 जून 2020 रोजी घडून आले. जेंव्हा चंद्र सूर्य पृथ्वी सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्य ग्रहण घडून येते. सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत खग्रास खंडग्रास व कंकणाकृती. खग्रास सूर्यग्रहनात सूर्य पूर्णपणे चंद्राकडून झाकला जातो तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण घडते. चंद्राचा सूर्याचा दृश्य आकार हा पृथ्वी वरून सारखाच आहे परंतु जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या कक्षेत अधिक अंतरावर असतो अशावेळी ग्रहण सूर्याभोवती प्रकाशाचे कण तयार होते अशा ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. दिनांक 21 जून चे सूर्यग्रहण राजस्थान हरियाणा उत्तराखंड विद्यार्थी राज्यातून कंकणाकृती दिसले उर्वरित भारतातून हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसले खामगाव येथील किसन नगर भागातील नागरिकांनी या खगोलीय घटनेचा प्रत्यय 200 मिली मीटर अंतरावरती दुर्बिणीद्वारे संदीप श्रीधनकर (महावितरण, अकोला परिमंडळ मध्ये कनिष्ठ अभियंता) यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टंसिंग ठेवून घेतला. पुढील सूर्यग्रहण दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी घडून येईल अशी माहिती संदीप श्रीधनकर यांनी निर्भिड स्वराज्य ला दिली आहे.