खामगाव : येथील समर्थ नगरचे बाजूला असलेल्या रमाबाई आंबेडकर चौक भागात २१ जून रोजी 45 वर्षीय महिला सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील समर्थ नगरचे बाजूला असलेल्या रमाबाई आंबेडकर चौक भागातील 45 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिचा स्वेब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान 21 जून रोजी स्वेब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे रात्री ८ सुमारास येथील आरोग्य यंत्रणा दाखल होऊन फायर ब्रिगेडच्या वाहनाने परिसरात हायपोक्लोराइड मारून परिसर निर्जंतुकीकरण केला, त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांचे सह नगर परिषद कर्मचारी परिसरात दाखल झाले होते दरम्यान सदर महिलेस रुग्णवाहिकेत द्वारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले संपर्कातील आणि जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
ReplyForward |