November 21, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

खामगांव पोलिसांच्या वतीने महिला दिन साजरा

खामगांव : जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो.महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे हा या दिवसांचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्ये ही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलां प्रती आदर व्यक्त करतात या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते, मात्र या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे महिला दिन अत्यंत साध्या पद्धतीने खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे साजरा करण्यात आला. प्रत्येक महिलेचे आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचं खास आहे. महिलाने केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला आदर आहे अशा बरीच गोष्टींची जाणीव ठेऊन जागतिक महिला दिन हा केंद्र व राज्य शासनाने यासंदर्भात निर्गमित केलेल्या सूचनांच्या अधीन राहून तसेच जिल्ह्यात covid-19 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने सुरक्षा या उपाययोजना संबंधीत आवश्‍यक ती खबरदारी घेऊन आज जागतिक महिला दिन खामगांव शहर पोलिसांच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करून करण्यात आला. बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत खामगाव, उपविभागीय पोलीस अधिकारीअमोल कोळी खामगाव, खामगाव शहर स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभाग, पोलीस विभाग, गृहरक्षक दलामध्ये सेवा देणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

Related posts

विम्याची रक्कम लाटण्यासाठी सामान्य रुग्णालयातून गोळा केल्या जाते कोरोना पॉझिटिव्ह स्वैब ?

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्ताराचा निषेध करत केले आंदोलन…

nirbhid swarajya

परवान्यांमध्ये नसलेला ३८३ बॅग रासायनिक खताचे गोडाऊन केले सील

nirbhid swarajya
error: Content is protected !!