April 19, 2025
आरोग्य गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

स्वाब न देताच रिपोर्ट आला कोव्हिड पॉजिटिव्ह…

आरोग्य विभागाच्या अजब कारभार…

आरोग्य विभागाची लक्तरे पुन्हा टांगली वेशीला…

बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा येथील पंडित देशमुख हे साधारण दुखण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेल्यावर त्यांना नोंदणी करुण घेत नंतर औषधोपचार करून घरी जाण्यास सांगितल मात्र आठवडाभरा नंतर त्यांना कोविड सेंटर मधून आपला कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला असून आपण तात्काळ भरती होण्यासाठी यावे असा त्यांना फोन आला. तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांनी स्वाब न देता आपला रिपोर्ट पॉजिटिव्ह कसा आला …? हा प्रश्न पडला, ते विचारण्यासाठी कोविड सेंटर गाठल तर त्याना उड़वा उडविचि उत्तर देण्यात आलिये. त्यामुळे जिल्ह्यातील कंट्राती कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालनारी कोविड यंत्रणा कशी आहे याचा प्रत्यय त्याना आला. आता ह्या प्रकारणाची सखोल चौकशी करुण दोषिवर कार्रवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत मिळालेल्या महितीनुसार पंडितराव हे साधारण आजारावर उपचारार्थ कोविड केंद्रामध्ये आले होते. मात्र तिथे टेस्ट करावी लागेल असे सांगण्यात आले नोंदणी करुण घेतली मात्र कुठलीच टेस्ट न करता ते निघून गेले. त्यांचा नावाचा स्वॅब घेण्याचा ट्युब तयार करण्यात आला होता. त्या ट्युबमध्ये दुसऱ्या नागरिकाचा स्वॅब टाकण्यात आला. शुक्रवारी तो अहवाल पॉझिटिव्ह आला, असे तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र पुरी यांनी फोन वर सांगितले. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल व ज्यांचा अहवाल पंडितरावाच्या नावाने पॉझिटिव्ह आला त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, पंडितरावाच्या नावाने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे नाव,पत्ता व मोबाईल नंबर लिहल्या गेला नसल्याने या रुग्णांला शोधून कसे काढले जाईल असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.यावरून जिल्ह्यातील पुन्हा आरोग्य विभागाचा भोंगळ कार्यभार समोर आला आहे.

Related posts

ज्ञानगंगा प्रकल्प 100 टक्के भरला; 36 गावांना सतर्कतेचा इशारा

nirbhid swarajya

दीड वर्ष चाललेली कर्जमाफी दोनच महिन्यात पूर्ण करणार – अजित पवार

nirbhid swarajya

माजी आ. सानंदा यांची रेती घाटांवरील रेती साठ्यांवर धाडी

nirbhid swarajya
error: Content is protected !!