November 20, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शेगांव

शेगाव पंचायत समितीचा लाचखोर शाखा अभियंता एलसीबीच्या जाळ्यात

शेगाव : हायमास्‍ट दिवे बसविल्‍याचे बिल काढून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्‍वीकारणाऱ्या शेगाव पंचायत समितीच्‍या शाखा अभियंत्‍याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने आज पंचायत समितीत रंगेहात पकडले. पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड (५७) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, सांगावा (ता. शेगाव) येथील ४२ वर्षीय कंत्राटदाराने एकफळ येथे अनुसूचित जाती नवबौत्र घटकांच्‍या वस्‍तीचा विकास करणे योजनेअंतर्गत हायमास्‍ट दिवे बसवले होते. हे काम २०२० रोजी पूर्ण झाले. केलेल्या कामाचे बिल १ लाख ४३ हजार ७०० रुपये झाले. त्‍याची ५ टक्‍के रक्‍कम ७५०० रुपये लाचेची मागणी शाखा अभियंता पुरुषोत्तम गायकवाड याने केली होती. मात्र लाच देण्याची इच्‍छा नसल्याने कंत्राटदाराने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शेगाव पंचायत समितीत आज सापळा रचला. तडजोडीअंती ७ हजार रुपयांची लाच स्‍वीकारताना पुरुषोत्तम गायकवाड याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आर. एन. मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी, विजय मेहेत्रे, चालक पो. शि. अर्शद शेख यांनी विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र,अरुण सावंत अप्‍पर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र, संजय चौधरी पोलीस उप अधीक्षक लचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्‍या मार्गदर्शनाखाली केली.

Related posts

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत. “पद्मश्री” पोस्टाने पाठवा साहेब !

nirbhid swarajya

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

nirbhid swarajya

खामगाव-जालनाच्या फील्ड सर्वे साठी रेल्वेचे अधिकारी बुलडाणा, जालन्यात दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!