जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश…
बुलडाणा : तालुक्यातील प्रसिद्ध सैलानी बाबाची ची यात्रा मागील वर्षी कोरोनाचे संकट पाहून रद्द करण्यात आली होती. यावर्षी ही कोरोनाचे वाढते संकट पाहून एप्रिल महिन्यात होणाऱ्या सैलानी यात्रा रद्द केल्याचे निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतले असून परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापासून बचावासाठी गर्दीची ठिकाणं टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील १०५ वर्षांची परंपरा असलेली सैलानी यात्रा रद्द करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर संदल आणि होळीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.जिल्ह्यात पुन्हा कोरोना विषाणूंची लागण झालेल्याचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर भारत सरकार आणि राज्य सरकारांनी मोठी पावल उचलली आहेत. लोकांना गर्दी ठिकाणं टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी कामाच्या ठिकाणचे बायोमेट्रिक हजेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत, त्याऐवजी नोंदवहीचा वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वच्छतेबाबतही जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर होळीच्या वेळी भरणाऱ्या सैलानी यात्रेत एकत्र येणाऱ्या लाखो भाविकांचा विचार करता बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी ही यात्राच रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.दरवर्षी या सैलानी यात्रेत 5 ते 8 लाख पर्यंत भाविक येत असतात.
