काम युध्दस्तरावर करण्याचे निर्देश
१३ कोटी खर्च करुन होणार उड्डाण पुल
खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी खामगांव-शेगांव मतदार संघाला जोडणारा जलंब रेल्वे क्रॉसींगवर उड्डाण पुल मंजूर करुन घेतला असून सदर उड्डाण पुलाचे बांधकामाच्या पायाभरणीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता, परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम रदद करण्यात आला होता. त्यामुळे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी जलंब येथे सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करुन सदर काम युध्दस्तरावर सुरु करण्यात येऊन उत्कृष्ट़ दर्जाचे काम करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरानो महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करा, तसेच कोराना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्देशांचे पालन करावे. मास्क् व सॅनिटायझरचा वापर करावा. आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडा, स्व़त:ची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या असे आवाहन ही खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.आकाश फुंडकर यांनी नागरीकांना केले आहे.
