November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

अवैध दारू विरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई; एका आरोपीस अटक

खामगांव : काल संध्याकाळी लॉकडाऊन लागण्याच्या पहिले शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध देशी दारूचे १० बॉक्स व कारसह ३ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे. खामगांव शहरात कोवीड- 19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मार्केट भागामध्ये गस्त सुरु असतांनापोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक इसम कारमधून अवैध देशी दारु घेवून जाणार आहे. सदर माहितीच्या आधारे कारचा शोध घेतला असता आठवडी बाजार खामगांव येथे केशरी रंगाची टाटा टियागो गाड़ी क्रमांक MH-२८-AN २१३९ ही गाडी मिळुन आली. यावेळी पोलिसांनी सदर कारच्या चाकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव भागवत देविदस जगदाळे वय २९ वर्ष रा. नांदुरा असे सांगीतले.यावेळी पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये देशी दारु टँगो पंच कंपनीचे १८० ml चे १० बॉक्स किंमती २४,९६०/- रुपयेचा मुद्येमाल मिळून आला.पोलिसांनी तात्काळ कर चालकाला मुद्देमालासह अटक करुन या कारवाईमध्ये कारसह एकुण ३,२४,९००/- रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला असुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई अरविंद चावरिया पोलीस अधिक्षक बुलडाणा, हेमराजसिंह राजपूत अपर पोलीस अधिक्षक खामगांव, अमोल कोळी उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल अंबुलकर पोलीस निरीक्षक, संतोष वाघ, राजेंद्र टेकाळे, दिपक राठोड, प्रफुल टेकाळे पो.स्टे. खामगांव शहर यांनी केली आहे.

Related posts

बोरी अडगाव ग्राम सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनलचा विजय

nirbhid swarajya

आदिवासी बांधवांना कपडे व फराळ वाटप करून दिवाळी साजरी

nirbhid swarajya

स्त्री रूग्णालय व सामान्य रूग्णालयातील अलगीकरण कक्षाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

nirbhid swarajya
error: Content is protected !!