April 18, 2025
खामगाव जिल्हा नागपुर बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शिक्षण

ई-पासपोर्ट तयार करण्यासाठी डिजी-लॉकरची लिंकही देता येणार

नागपुर : आता पासपोर्ट तयार करणं आणखी सोपं झालं आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्सची फिजिकल कॉपी घेऊन जावी लागणार नाही. याऐवजी आता तुम्हाला DigiLocker मध्ये अपलोड केलेले डॉक्युमेंट्सची लिंकही देता येईल. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लवकरच ई-पासपोर्ट सुविधाही लाँच करण्याच्या तयारीत आहे. मंत्रालयानं आपल्या आगामी Passport Seva Programme V2.0 या योजनेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, चॅटबॉट्स, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. DigiLocker हा एकप्रकारचा व्हर्च्युअल लॉकर आहे. ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्माचं प्रमाणपत्र, पासपोर्ट, लाइफ इंश्योरन्स पॉलिसी, हेल्थ पॉलिसी अथवा मोटर पॉलिसी, पॅन कार्ड, वोटर आईडी सहित पॉलिसी डॉक्युमेंट्स अशी अनेक महत्त्वाची कागदपत्रे डि़जिटली सेव्ह करता येतात. DigiLocker सुरू करण्यासाठी digitallocker.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. तसंत तुमचा फोन आधार कार्डासह लिंक आहे का नाही याचीदेखील पडताळणी करावी लागेल. जर तुमचा फोन क्रमांक आधार क्रमांकाशी रजिस्टर नसेल तर तुम्हाला या सुविधेचा वापर करता येणार नाही. यानंतर त्या ठिकाणी असलेल्या साईन अप या बटनावर क्लिक करा. त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाका. यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक एन्टर करा. आधार क्रमांक एन्टर केल्यानंतर 2 पर्याय मिळतील. त्यातील पहिला म्हणजे ओटीपी आणि दुसरा म्हणजे फिंगरप्रिन्ट. यापैकी कोणत्याही पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युझरनेम आणि पासवर्ड टाकायला सांगितला जाईल. त्याच्या मदतीनं तुम्ही digiLocker लॉग इन करू शकाल. DigiLocker लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वैयक्तीक खात्यात दोन सेक्शन दिसतील. पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला निरनिराळ्या संस्थांद्वाके जारी करण्यात आलेली सर्टिफिकेट्स, त्यांच्या लिंक, जारी केल्याची तारीख आणि ते शेअर करण्याचा पर्याय मिळेल. दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला अपलोड करण्यात आलेले सर्टिफिकेट, त्यांची माहिती, शेअर आणि साईन इनचा पर्याय असेल. तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडा. जर तुम्ही कोणतं सर्टिफिकेट अपलोड करू पाहत असाल तर माय सर्टिफिकेटवर क्लिक करा. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडवर क्लिक करून तुमचं सर्टिफिकेट निवडा. यानंतर त्यात विचारण्यात आलेली माहिती भरा. अशा प्रकारे तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स या DigiLocker मध्ये सुरक्षित ठेवू शकता.

Related posts

दबावाखाली येऊन इसमाची विष घेऊन आत्महत्या; तिघां विरुद्ध गुन्हा दाखल..

nirbhid swarajya

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी पीक कर्ज वितरणाचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी

nirbhid swarajya

शहीद जवान चंद्राकांत भाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

nirbhid swarajya
error: Content is protected !!