April 19, 2025
अकोला अमरावती आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शिक्षण

१०वी, १२वी परीक्षांच्या तारखा बदलल्या…

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता सालाबादप्रमाणे यंदा नियोजित महिन्यामध्ये परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं आहे. नवीन वेळापत्रक-दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या १०वी, १२वी च्या परीक्षा यंदा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. १०वी ची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान होणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे.१२वी ची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान होणार आहे. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठीही एप्रिल आणि मे महिन्यामधील लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले आहे. कोरोनासंदर्भात आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतच परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Related posts

ऑपरेशन मुस्कान दरम्यान शहर पोलीसांनी हरविलेल्या बालकास दिले ताब्यात

nirbhid swarajya

पाण्याचे दर कमी करा अन्यथा कठोर कारवाई करा सुटाळा खुर्द सरपंच देशमुख यांचे पत्र

nirbhid swarajya

शॉक लागून ५५ वर्षीय इसमाचा मृत्यु

nirbhid swarajya
error: Content is protected !!