November 20, 2025
गुन्हेगारी महाराष्ट्र मुंबई राजकीय

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलीस आयुक्त ‘वर्षा’ वर?

मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी केलेल्या कारवाईच्या मागणीमुळे आणि वाढत्या सोशल मिडियावरील दबावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात पुढे येत असल्याने, विरोधकांनी शिवसेनेवर चांगलाच दबाव टाकला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असून, या प्रकरणातील प्रत्येक बाबीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. विरोधक आणि शिवसेनेचे मंत्री, तसेच अधिकारी महोदय देखील मुख्यमंत्री याबाबत अधिक भाष्य करतील असे सांगत आहेत. त्यामुळे सरळ मुख्यमंत्र्यांवर चा दबाव आता वाढत आहे. मेडिकल रिपोर्ट, याप्रकरणी मिळालेले जवाब, आणि व्हायरल झालेले संभाषण, त्यातील आवाज संजय राठोड यांचा आहे का याबाबतची पडताळणी अशा अनेक गोष्टींचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज दिवसभरात मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे.

Related posts

मी पाहिलेले कुटुंबप्रमुख ते मुख्यमंत्री

nirbhid swarajya

देशविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचून देशाला बळकट करा- सागर फुंडकर

nirbhid swarajya

रेल्वे मार्गासाठी स्वाभीमानीचे आंदोलन

nirbhid swarajya
error: Content is protected !!