April 19, 2025
जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय लोणार विदर्भ

धारातीर्थ परीसर व दैत्यसुदन मंदीराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

विकास कामांबाबत दिल्या सुचना
सेल्फी घेऊन सरोवराचे केले छायाचित्रण

बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोणार येथील धारातीर्थ परिसराची पाहणी केली. धारातीर्थ येथील सतत वाहणारी धार, परीसरात असलेली वृक्षवल्ली, वन्यजीव आदींची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. माहिती घेत असतानाच परीसर विकासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा कृउबासचे सभापती जालींधर बुधवत आदींसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरोवरासोबत सेल्फी सुद्धा घेतला. तसेच उपस्थितांसोबत सरोवराचे छायाचित्रणही केले. धारातीर्थ परीसराच्या विकासाबाबत सुचना देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, परीसरातील जमिनीचे सपाटीकरण करून लँण्डस्केप विकसित करावे. अतिशय मानव निर्मित वाटू नये याची काळजी घेत त्याला नैसर्गिक टच ठेवावा. सौंदर्यीकरण करून शोभेची झाडे लावण्यात यावीत. परीसराच्या विकासासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. धारातीर्थ परीसराची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी गावातील दैत्यसुदन मंदिराला भेट दिली. दैत्यसुदन मंदीरात आत जात मुख्यमंत्र्यांनी येथील ऐतिहासिक शिल्पाविषयी माहिती घेतली. दैत्यसुदन मंदिरातील कोरीव कामाची पाहणीही त्यांनी केली. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत छायाचित्रण केले. कोरीव कामांचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. यावेळी लोणार सरोवराचे अभ्यासक स्व. सुधाकर बुगदाने यांच्या स्नुषा शैलेजा श्रीपाद बुगदाने व शुभदा स्वप्नील बुगदाने यांनी स्व. सुधाकर बुगदाने लिखीत लोणार सरोवर हे पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिले.

Related posts

Photo Exhibit Puts Talents, Emotion On Display

admin

बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस

nirbhid swarajya

How Good Interior Design Helps Elevate The Hotel Experience

admin
error: Content is protected !!