November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

आ.अँड.आकाश फुंडकर यांचे वाढदिवसानिमित्त युवकांनी केले रक्तदान

खामगाव: भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे वाढदिवस च्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर पार पडले.या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन भाजपा युवा व युवती मोर्चा, व भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात करण्यात आले होते. या शिबिराबाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ शिक्षण मंडळाचे सचिव प्रा.प्रशांतदादा बोबडे होते. तर प्रमुख उपस्थितीत सोशल मीडिया प्रदेश संयोजक सागर फुंडकर, नगराध्यक्ष सौ अनिताताई डवरे, उपाध्यक्ष मुन्नाभाऊ पुरवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी , जिल्हा सचिव संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, विजय भालतीडक, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, न प गटनेते राजेंद्र धानोकार, पप्पूसेठ अग्रवाल,चदुसेठ मोहता , संतोषसेठ डीडवानी, जेष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते, दर्शनसिंग ठाकूर, ओंकारअप्पा तोडकर, बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे, विनोद टिकार, राकेश राणा न प सदस्य तथा भाजयुमो जिल्हा सरचिटणीस,भाजयुमो शहर संघटक नगेंद्र रोहनकार भाजप विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड,भाजप युवती आघाडी शहराध्यक्ष सौ स्नेहा चौधरी, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. भाजयुमो खामगाव शहर, विध्यार्थी आघाडी, युवती आघाडीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १९३ युवकांनी रक्तदान केले. दरवर्षी आयोजित भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. तसेच आमदार अँड आकाश फुंडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी वर्षीपेक्षा या वर्षी तिप्पट नागरिकांनी गर्दी केली. यावेळी भाजयुमो, विद्यार्थी आघाडी, युवती मोर्चा, आदी खामगाव शहर भाजप आघाड्यांचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप आमदार अँड.आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शेखर कुलकर्णी व रघुनाथ खेर्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राम मिश्रा यांनी केले. तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भाजपा युवा मोर्चा, युवती मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.

Related posts

ग्रामपंचायत निवडणूक ,खामगाव मतदारसंघात भाजपा सर्वात मोठा पक्ष

nirbhid swarajya

वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर २७ जुलै रोजी खामगावात

nirbhid swarajya

बुलढाणा अर्बन च्या वतीने वैशाखी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

nirbhid swarajya
error: Content is protected !!