January 4, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शेतकरी

माझ भाग्य़ आहे की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करुन माझा वाढदिवस साजरा करीत आहे – ॲड.आकाश फुंडकर

खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या वाढदिवशी भारतीय जनता पार्टीतर्फे आज जिल्हाभरातील सर्व महावितरणचे कार्यालये, उपकेंद्र हयांना “टाळा बंद व हल्ला बोल” आंदोलन करण्यात आले. हया आंदोलनात आमदार ॲड आकाश फुंडकर हे देखील सामील झाले होते. हयावेळी शहर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बोलतांना आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, राज्य़ सरकारच्या विरोधात जनसामान्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. राज्य सरकारने रोहित्र बंद झाल्यास ८० टक्के विज बिल भरावे लागेल, आज शेतात हरबरा, गहू ही पिक उभे आहेत आणि हया सरकारने पुरविलेले रोहित्र हे खराब असून ते लावल्याबरोबर बंद पडत आहेत हया रोहित्रांना पुरविण्यासाठी सरकारकडे तेल नाही त्यामुळे अनेक दिवस रोहित्र मिळत नाहीत. हया सरकारचा संपुर्ण अनागोंदी कारभार सुरु आहे. त्यामुळे हयापुढे जर हे सरकार वठणीवर नाही आल तर अधीक तिव्र आंदोलन कराव लागेल. वीज वितरण कंपनीचा सुरु असलेला अनागोंदी कारभार पाहता भारतीय जनता पार्टी तर्फे राज्य़भरात महावितरणच्या कार्यालये व उपकेंद्राना टाळा बंद व हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर हयांनी “हया दिवशी माझ्या वाढदिवस असल्यामुळे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक हयांना आवाहन करण्यात येते की “माझा वाढदिवस महावितरणच्या सर्व कार्यालये व उपकेंद्रांना “टाळा बंद व हल्ला बोल” आंदोलन करुन साजरा करण्यात यावा” असे आवाहन केले होते. हया आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हयांनी महावितरणच्या कार्यालये तसेच उपकेंद्रांवर टाळा बंद व हल्ला बोल आंदोलन केले. महाविकास आघाडी विरोधातल्या हया आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, संजय शिनगारे, जितेंद्र पुरोहित, गणेश माने, संजय शर्मा, सुभाष इटनारे, सत्यनारायण थानवी, वैभव डवरे, चंद्रकांत रेठेकर, महेंद्र रोहणकार, नंदु कांडेकर, ओमसेठ खंडेलवाल, ओम शर्मा, राकेश राणा, हिरालाल बोर्डे, संजय मोहिते, गणेश सोनोने, गणेश जाधव, जितेंद्रसिंह मेहरा, गणेश कोमुकर, महादेवराव कांबळे, अशोक हटटेल, अरुण आकोटकर, सुरेश घाडगे, प्रमोद सरोदे, राम बोंद्रे, ॲड संजयकुमार गुजर, गजानन मुळीक, उमेश चांडक, विजय उगले, पप्पु शहाणे, रवि गायगोळ, विक्की चौधरी, सचिन पाठक, सदानंद देशमुख, अशोक मानकर, लुणकरण राठी, पवन राठोड यांची उपस्थ‍िती होती.

Related posts

लोककलावंत व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मदत करा – सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे

nirbhid swarajya

अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला

nirbhid swarajya

विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न – उदय सामंत

nirbhid swarajya
error: Content is protected !!