“तुला बघुन झिंगणाग चिकणांग होतंय “
या गाण्यावर रसिक मंत्रमुग्ध
खामगांव : डॉक्टर गणेश पाटील निर्मित ” तू फक्त हो म्हण “या मराठी चित्रपटा च्यां चित्रीकरणासाठी प्रसिद्ध सिनेतारका मानसी नाईक ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात निसर्गरम्य बोथा येथे आलेली होती. योगायोग मानसीचा वाढदिवस असल्याने सेटवरच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी मानसीचे पती प्रदीप खरेरा उपस्थित होते आणि तू फक्त हो म्हण या चित्रपटाची पूर्ण टीम हजर होती.तीन फेब्रुवारीला मानसीचा वाढदिवस असतो आणि तू फक्त हो म्हण या मराठी चित्रपटाच्या ॲटम सॉंग करिता मानसी ही बुलढाण्याला तिच्या पतीसोबत आलेली होती 2 फेब्रुवारी च्या रात्री बारा वाजता मानसीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.बोथा गावा मध्ये चित्रीकरण करण्यासाठी आली असल्याने बोथा गावकरी आणि परिसरातील लोकांनी मानसीच्या वाढदिवसानिमित्त बर्थडे केक आणला आणि सर्व लोकांनी मिळून मानसी चा वाढदिवस साजरा केला आणि भरपूर शुभेच्छा दिल्या.परंतु एवढ्या छोट्याशा गावात एवढी मोठी प्रसिद्ध सिनेतारका आल्याने गावातील व परिसरातील जनतेला तिला बघण्याचा योग आला.या चित्रपटांमध्ये परिसरातील व गावातील युवकांना नृत्य करण्याची संधी मिळाली.जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कलाकार आपल्याला बघायला मिळतील तू फक्त हो म्हण ह्या चित्रपटाचे सर्वेसर्वा आणि निर्माता व दिग्दर्शक गणेशराव पाटील नांदुरा व संगीत दिग्दर्शक व निर्माता भास्कर दाभेरावं यांनी या परिसरातील जनतेला मानसी नाईक सारखी मोठी अभिनेत्री बघण्याचा आणि तिच्या खुमासदार शैलीत नृत्य करण्याचा जो आनंद दिला त्याबद्दल गावकऱ्यांनी या दोघांचेही आभार मानले.लवकरच आपल्या भेटीला तू फक्त हो म्हण हा अस्सल मराठी चित्रपट येणार आहे या चित्रपटांमध्ये मला आमदार झाल्यासारखे वाटते फेम मोनालीसा बागल ही मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार असून नायक म्हणून निखिल वैरागर हा असणार आहे या चित्रपटामध्ये माजी आमदार तुकाराम बिडकर , डॉक्टर गणेशराव पाटील, मोहन कुलकर्णी, नागराज मंजुळे च्या नाळ चित्रपटातील, आणि वऱ्हाडी बाणा साऊथ चा दिवाना चित्रपटातील नामवंत कलाकार गणेश देशमुख , जोया खान , बंडू अंबुसकर, अनिल अंजनकर, प्रदीप सातव , गजानन राऊत सहित अनेक नामवंत कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत .बोथा गावामध्ये मानसी नाईकच्या ॲटम सॉंग करिता गायन प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी केले आहे.त्यामुळे मानसी नाईक चे हे गाणे अतिशय हिट होणार असून तरुणांच्या दिलाची धडकन असणार आहे.या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ,आनंद शिंदे ,आर्या आंबेकर, पूजा पाटील यांनी गायन केले आहे तर भास्कर दाभेराव यांनी गीत लिहिले आहेत.