January 1, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शिक्षण शेतकरी

माझा वाढदिवस महावितरणची सर्व कार्यालये उपकेंद्र हयांना टाळा बंद व हल्ला बोल आंदोलन करुन साजरा करा- ॲड. आकाश फुंडकर

खामगांव : भारतीय जनता पार्टीतर्फे दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यभरातील सर्व महावितरणचे कार्यालये, उपकेंद्र हयांना “टाळा बंद व हल्ला बोल” आंदोलन करण्यात येणार आहे. हया दिवशी माझ्या वाढदिवस असल्यामुळे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक हयांना आवाहन करण्यात येते की “माझा वाढदिवस महावितरणच्या सर्व कार्यालये व उपकेंद्रांना “टाळा बंद व हल्ला बोल” आंदोलन करुन साजरा करण्यात यावा” असे आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर हयांनी केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सर्व क्षेत्रात अत्यंत बेजाबदार व अनागोंदी कारभार सुरु आहे. त्यातल्या त्यात महावितरणच्या कामकाजाचा पुर्ण गोंधळ उडाला आहे. महाविकास आघाडी सरकारने विज देयके कमी करण्यात येतील १०० युनिट वापरा पर्यंत शेतकरी बांधवांचे वीज देयके माफ करण्यात आली नाहीतच शिवाय सर्व विद्युत ग्राहकांना अव्वाच्यासव्वा बिले आकारण्यात आली असून त्यांची तुघलकी वसुली राज्य सरकारव्दारा करण्यात येत आहे. वीज देयके माफी नाही उलट दिलेली वीज देयके हे भरावेच लागतील असे सुध्दा राज्याचे उर्जा मंत्री यांनी जाहीर केले. संपुर्ण महाराष्ट्रातील ७८ लाख वीज कनेक्श़न कापण्याचे काम सरकारव्दारे सुरु आहे. हया विरोधात रोहित्रामध्ये टाकायला महाभकास आघाडीच्या कार्यकाळात तेल नाही. कृषी पंपाची रोहित्रे सतत जळतात व ती बदलून मिळत नाहीत. विज पुरवठा नियमीत होत नाही. कमी अधीक दाबामुळे विद्युत उपकरणे जळतात. महावितरणचे अधिकारी ग्राहकांना सन्माननीय वागणुक देत नाही.यासाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते हयांनी आपापल्या भागातील महावितरणच्या सर्व कार्यालयावर, उपकेंद्रावर “टाळा बंद व हल्ला बोल” आंदोलन करायचे आहे. आपल्या भागात असलेलया कार्यालयावर जाऊन अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारुन महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकावे असे आवाहन आमदार ॲड.आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष हयांनी केले आहे.

Related posts

खामगाव जालना रेल्वे मार्ग लवकर होण्यासाठी बुलढाणा अर्बनचा पुढाकार…

nirbhid swarajya

पिकांच्या हमी भावात मोठी वाढ केल्याबद्दल मोदी सरकारचे आभार

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये वीज ही लॉकडाऊन!

nirbhid swarajya
error: Content is protected !!