तेलगी प्रकारणासारखे अजून घबाड उघडण्याची शक्यता
खामगाव : येथील प्रेम रेसिडेन्सी हॉटेल चे संचालक प्रदीप प्रेमसुखदासजी राठी यांनी टेंभुर्णा शिवारातील १४ प्लॉट संबंधाने स्वतःच्या घरी खोटे शासकीय मुद्रांक तयार करून ते मुद्रांक फ्रॅंकींग करून खरा असल्याचे वापरून बनावट व खोटे दस्तावेज तयार केला. बनावट रस्त्यावर खरा म्हणून वापरला तसेच वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे पदाचे खोटे शिक्के तयार करून व त्यांच्या खोट्या सह्या करून खरेदी खत तयार करुन १ कोटी ६४ लाख रुपयांची प्रदीप राठी यांनी फसवणूक केल्याची तक्रार येथील श्रीमती अंजू लवकेश सोनी वय ४७ रा.सराफ गल्ली खामगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारीत सांगितले आहे. यामुळे खामगांव मधे ट्यावधीचा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. प्रदीप राठी यांनी खोटे दस्तावेज तयार करुन केलेला हा घोटाळा सर्च रिपोर्ट नंतर समोर आला आहे. या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या प्रदीप राठी यांच्या प्रेम रेसिडेन्सी हॉटेल व त्यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी बुलडाणा येथून २० कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. त्यांच्या तिन्ही प्रतिष्ठान आवर आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणा येथील अधिकारी व कर्मचारी चौकशी करता तसेच झडती करता गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येथील श्रीमती अंजू लवकेश सोनी यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रारी मध्ये असे नमूद केले आहे की त्यांचे पती लवकेश सोनी यांचा २००७ मध्ये मृत्यू झाला होता.मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे लवकेश सोनी यांनी सन २००० मध्ये वल्लभदास राठी यांच्याकडून टेंभुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २४ मधील १० प्लॉट विकत घेतले होते,तसेच लक्ष्मण निमकर्डे यांच्याकडून ४ प्लॉट घेतले होते. याबाबत सदर प्लॉटची दुय्यम निबंधक कार्यालयात सदर दस्ताची नोंद आढळून आली नाही. परंतु प्रदीप राठी यांनी माझे पतीचे निधन झाल्यानंतर २००७ ते २०२० दरम्यान मी गृहिणी असल्याचा गैरफायदा घेऊन माझ्या पत्नीच्या नावावर असलेल्या टेंभुर्णा शिवारातील १४ प्लॉटचे बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री करून माझी १ कोटी ६४ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद मध्ये नमूद केले आहे. अंजू सोनी यांनी दी.११ जानेवारी २०२१ रोजी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरण जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा यांच्या कडे पाठवले होते. जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत खामगांव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन चौकशी केली व त्यांचा जबाब नोंदिवला.स्थानिक चौकशी अंति आज खामगांव शहर पोलीस स्टेशन मधे आरोपी प्रदीप राठी विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ४२०,४२३,४६५, ४६८,४७१, ४७२,४७५, २५५,२६०,तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००६ नुसार ६६d गुन्हा दाखल केला आहे.या प्रकारणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली तर यामधे खामगांव मधील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही हे मात्र खरे
