January 7, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शिक्षण शेतकरी

खामगांव पंचायत समिती समोर संगणक परिचालकाचे निषेध आंदोलन

काळ्या फिती लावत निदर्शने करून शासन निर्णयाची होळी केली होळी

खामगांव : ग्रामविकास विभागाअंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १० वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी नी केलेली असताना संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीला बगल देऊन आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात भ्रष्टाचार करणार्‍या कंपनीला परत काम देऊन संगणकपरिचालकांच्या मानधनात १००० रुपये वाढ करून जखमेवर मीठ चोळण्यात आले. शासनाने १४ जानेवारी २०२१ रोजी चे दोन्ही शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज खामगांव पंचायत समिती कार्यालयासमोर काळ्या फिती लावत, निदर्शने करून शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे. संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. परंतु शासनाने संगणकपरिचालकाना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आपले सरकार प्रकल्पात काम करणार्‍या संगणकपरिचालकांवर नेहमी अन्याय करण्यात आलेला आहे. ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६००० रूपये मानधनात १००० रुपये वाढ केली.आज महागाईच्या काळात १००० रूपयाच्या वाढीत संगणकपरिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना शासनाने कंपनी सोबत मिलिभगत करून संगणकपरिचालकांवर अन्याय केल्याची भावना संगणक परिचालकांमध्ये आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात संगणक परिचालकांच्या मनात तीव्र असंतोष आहे. लवकरात लवकर शासन निर्णय रद्द करावा व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी आज पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष अनंता शेळके,अमोल भोसले ,दादाराव ठोंबरे ,वैभव टिकार ,प्रकाश शालिग्राम भटकर, रवींद्र बोदळे, विनायक देशमुख, रामेश्वर चित्रे ,बुद्धदेव इंगळे, विजय लोखंडे ,सतीश बहुरूपे, गजानन चित्रे अमोल तायडे, धम्मा गवई ,सचिन अंकुश भगत, महादेव मेतकर, पवन ठाकरे ,पंकज देशमुख, शुभम लांडे ,विशाल जैन ,मंगेश दसरकार आदि संगणक परिचालक उपस्थित होते.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 197 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 37 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

भाजपा तालुका महिला आघाडीचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

nirbhid swarajya

भाजपचं मंदिरं सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन

nirbhid swarajya
error: Content is protected !!