November 20, 2025
बातम्या

काळी पिवळी व कंटेनरचा भीषण अपघात

३ ठार, ९ प्रवासी जखमी, नांदुरा – वडनेर मार्गावरील घटना


नांदुरा : भरधाव कंटेनरने काळी पिवळी ला धडक देवून झालेल्या भिषण अपघातात पती – पत्नीसह तिघेजण ठार तर ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दि.२४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा – वडनेर मार्गावरील वडी गावानजिक घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काळी पिंवळी क्रमांक एमएच २८ बी ९३२९ नांदुराकडून मलकापूरकडे प्रवासी घेवून जात असताना वडनेर कडून नांदुराकडे भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनर क्रमांक आर जे १० जीए ७५९९ च्या चालकाने वडनेर नजीक काळी पिवळीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात काळी पिवळी मध्ये बसलेले प्रवासी सुनिल सुभाष तायडे, सौ.अर्चना सुनिल तायडे रा.वडनेर हे दोघे पती – पत्नी व भगीरथाबाई विठ्ठल दळवी रा.वडनेर या तिघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यु झाला. तर सौ.आशा पुुंडलीक जंगले रा.काटी, सौ.जय अनंतराव जंगले रा. काटी, रामचंद नथ्थू सातव रा.वडनेर, सौ.पुष्पा गजानन इंगळे रा.वडनेर, कु.श्रेया सुनिल तायडे, कु.तनिष्का रमेश होनाडे, रियांश सुनिल तायडे, सौ.कमल दिनकर पांडे, सौ.बेबाबाई राजाराम सातव दोन्ही रा.वडनेर हे ९ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमेसाई फाऊंडेशनच्या कार्यकर्ते विलास निंबोळक, पत्रकार प्रविण डवंगे, आनंद वावगे आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. पुढील उपचाराकरीता खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान अपघातस्थळावरून कंटेनर चालकाने कंटेनर घेवून पळ काढला होता. त्याला नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नांदुरा शहरात पकडण्यात आले. याप्रकणी कंटेनर चालक जिवन नलबतसिंग मालवी वय ३२ वर्ष रा.निपानी खुर्द जि.साजापूर राज्य मध्यप्रदेश याला नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे.

Related posts

शहीद चंद्रकांत भाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवानांकडून शेगावात वृक्षारोपण

nirbhid swarajya

The Workout Plan To Get Ripped Without Breaking A Sweat

admin

अतुल पाटोळे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानीत

nirbhid swarajya
error: Content is protected !!