November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा शेतकरी

शासकीय आधारभुत किंमत योजनेंतर्गत आ.आकाश फुंडकर यांच्या हस्ते थाटात शुभारंभ

हमीभावासाठी शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गतच तुर विक्रीस आणावी- आ.आकाश फुंडकर

खामगाव : शासकीय खरेदीचा शुभारंभ ॲड.आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते आणि खामगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबुरावशेठ लोखंडकार यांच्या शुभहस्ते काटा पूजनाने व आलेल्या शेतकऱ्यांच्या सत्काराने मोठया थाटात संपन्ऩ झाला. आज दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी शासकीय आणि नोंदणी केलेल्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी बाबुरावसेठ लोखंडकार यांच्या हस्ते काटयाचे पुजन व नारळ फोडण्यात आले. त्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तुर खरेदीस सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थ‍ित शेतकऱ्यांचा आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतक-यांनी सातबारा उताऱ्यावर तुरीची नोंद करुन नवीन सातबारा आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक झेरॉक्स हयासह नोंदणी करावी. हयासाठी बँकेत आधार लिंक केलेले पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी विदर्भ मार्केटिंग कडून खामगाव तालुका खरेदी विक्री संस्थेव्दारा करण्यात येणार आहे. या वेळी खरेदी विक्री व्यवस्थापक मनोहर बोराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुकूटराव भिसे, मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

Related posts

दिवाळी साठी फत्तरकारांची दगमग नारद तळमळ करत पुजातोय घरं मोठ्या घराच्या दिवाळीसाठी होतायत बैठका

nirbhid swarajya

हिंदुराष्ट्र सेनेच्या बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष पदी सागर बेटवाल…

nirbhid swarajya

वसीम रिझवी विरोधात शेगावात निवेदन

nirbhid swarajya
error: Content is protected !!