January 7, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

भविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार ,राधेश्याम चांडक यांची ग्वाही

बुलडाणा : भविष्यात बुलडाणा येथे रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार अशी ग्वाही बुलडाणा अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उर्फ भायजी यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर,पत्रकार दिनाचे औचित्य साधून टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात दिली.असोसिएशनच्या अध्यक्ष वसीम शेख यांनी आपल्या मनोगतामध्ये बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून भायजी यांनी गरीब रूग्णांसाठीचॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करावी ही विनंती केली होती.रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, बुलडाणा अर्बन सोसायटीचे राधेश्याम चांडक, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन, टिव्ही जर्नालीस्ट असोसिए शनचे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, संदीप शेळके आदी उपस्थित होते. शिबिराच्या सुरुवातीला आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, आद्यसंपादीका तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.सुरुवातीला असोसिएशनच्या सचिव युवराज वाघ यांनी प्रस्ताविकाच्या माध्यमातून शिबिराची रूपरेषा विशद केली तर असोसिएशनच्या अध्यक्ष वसीम शेख यांनी कोरोना काळातील पत्रकारितेवर प्रकाश टाकून बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून भायजी यांनी गरीब रूग्णांसाठीचॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करावी ही विनंती केली.

यानंतर रविकांत तुपकर यावेळी म्हणाले, अगदी तुटपुंज्या पगारावर किंवा मानधनावर पत्रकार काम करीत असतात. कोविडच्या परिस्थितीत केवळ पगारासाठी काम न करता व आपले आरोग्य धोक्यात घालून पत्रकारांनी वार्तांकन केले. हे खरेच कौतुकास्पद आहे. केवळ चरितार्थासाठी काम न करणारे पत्रकार हे खरोखरच समाजसेवकच आहेत.

आमदार संजय गायकवाड यावेळी म्हणाले, कोविड काळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना सातत्याने अनुभवास आल्या. कोविडने मृत्यू झालेला असल्यास त्याचे प्रेतही नातेवाईक घेत नव्हते. आपलेस आपल्या दूर सारत असल्याचा हृदयद्रावक अनुभव आला. मात्र काहींनी या कठीण काळात माणुसकी जागविणारे काम केले. रक्तदान करून कोविड रूग्णांना आवश्यकतेनुसार रक्तही त्याकाळात पुरविल्या गेले.

तर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,समाजाचे वेगवेगळे ऋण प्रत्येकावर असतात. कोविडच्या काळात या ऋणांचे महत्व अधिकतेने पुढे आले. आपण समाजाला काही देणे लागतो. या भावनेतून हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून पत्रकारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून या माध्यमातून समाज ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतीपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, कोविड काळात पत्रकारांनी  उत्कृष्ट काम करीत समाजाला जागृत करण्याचे काम केले.  त्यामुळे कोरोना विषाणू विरोधात जनजागृती  होण्याचे मोलाची मदत झाली. पत्रकारांकडून रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे. मागील काळात  रक्ताचा तुटवडा राज्यात होता . त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत चांगल्या प्रकारे रक्त संकलन राज्यात होत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने प्रयत्न केले. त्यामध्ये यशही मिळत आहे.

अध्यक्षीय मनोगतामध्ये राधेश्याम चांडक यावेळी म्हणाले, बुलडाणा अर्बन भविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार आहे असल्याची ग्वाही दिली. चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मितीच्या माध्यमातून गरीब रूग्णांची सेवा करण्याची संधी संसथेला मिळेल. रक्तदान हे महत्वाचे दान आहे. या दानामुहे लोकांचे जीव वाचतात. असे पवित्र कार्य पत्रकारांनी हाती घेतले ही स्तुत्य बाब आहे.असे म्हणाले.

यावेळी टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने हाजी सै. उस्मान नगर परिषद शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार आदर्श बहुमान मिळाल्याने मुख्याध्यापक रईसोद्दीन काजी यांचा व कोरोना काळात एकही दिवस रुग्णालय बंद न ठेवल्यामुळे संचेती हृदयालयाचे डॉ. सौरभ संचेती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार गजानन धांडे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.तर आरोग्य शिबिराला आमदार श्वेताताई महाले यांनी सदिच्छा भेट दिली.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संदीप वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश सोळंकी, संदीप शुक्ला, संजय जाधव, निलेश राऊत, जका खान , दीपक मोरे , शिवाजी मामलकर , नितीन कानडजे, आदेश कांडेलकर, सुनील मोरे, सागर वानखेडे, विनोद कोल्हे यांनी अथक परिश्रम घेतले.तर बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

ट्रक व मोटार सायकल चा अपघात पत्नी व मुलगा ठार

nirbhid swarajya

शेतातील गोडाऊन मधुन 2 लाखाचे सोयाबीन लंपास,टेंभुर्णा शिवारातील घटना

nirbhid swarajya

केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!