November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेतकरी

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव ;शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

खामगांव : मर रोगांमुळे पिके वाळून जात असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांसमोर विविध समस्यांचा डोंगर उभा आहे. जिल्ह्यात उशिरा पेरणी झाल्याने तूर पिकावर ढगाळ वातावरणामुळे व बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. आहे १५ ते २० दिवसापासून मर रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे, मात्र मर रोग नियंत्रणात न आल्याने तुरीचे पीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. खामगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पीक मर रोगाच्या संकटात सापडल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांवर कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे मात्र योग्य मार्गदर्शन बाबत कृषी विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Related posts

लॉकडाऊन मधे घराघरात रामयणाचा गजर

nirbhid swarajya

महाराष्ट्रातील ९५ वारकऱ्यांची सुटका

nirbhid swarajya

खामगावात डि,बी पथकाची मोठी कारवा ईचोरी प्रकरणातील चार आरोपीसह मुद्देमाल जप्त…

nirbhid swarajya
error: Content is protected !!