November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

तहसीलदार रसाळ यांनी दिली माहिती

खामगांव : अनेक तांत्रिक अडचणींमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहत आहेत. हे उमेदवार वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारणाचा निर्णय घेतला आहे. २९ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ सुद्धा वाढवून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करण्यात आली आहे. यासोबतच नामनिर्देशनपत्रे आणि कोरे नमुने तत्काळ उपलब्ध करावे,असा आदेशही निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. यासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्रातही सूट देण्यात आली आहे. २९ डिसेंबर आणि ३० डिसेंबर २०२० या दोनही दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने जात पडताळणी प्रमाणपत्राचा अर्ज स्विकारण्याच्या सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितींना दिले आहेत. ज्या अर्जदारांचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिले आहेत, त्यांची माहिती विहीत नमुन्यात पाठविण्याचेही नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची किंवा जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑफलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related posts

महिला व बालविकास भवन कक्षाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

nirbhid swarajya

विनायकराव मेटे साहेबांच्या अपघाताची चौकशी करा :- मराठा संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन….

nirbhid swarajya
error: Content is protected !!