खामगांव : पो.स्टे.खामगाव शहर येथे पो.अधिक्षक बुलढाणा यांच्या आदेशाने शहर पोलीस स्टेशन मधे पो.उपनि.आर.एम.ठाकुर,व पोलीस कर्मचारी असे गठीत करून पो.स्टे.परिसरात हरविलेले /अपहरण झालेले मुले व मुली यांचा शोध घेण्याबाबत आदेश दिला होता.सदर आदेशाने पथक हे पो.स्टे.परिसरात ऑपरेशन मुस्कान दरम्यान पेट्रोलींग करित असतांना खामगाव शहरातील बाळापुर बायपास वरिल एरिगेशन ऑफिससमोर एक अंदाजे ४ ते ५ वर्ष वयोगटातील मुलगा रडतांना मिळून आला.पोलिसांनी त्यास नाव ,गाव विचारले असता तो मुलगा तुटक तुटक सांगत बोलत होता. शहर पोलिसांनी त्या मुलाला पो.स्टे.ला आणुन त्यास विचारणा केली असता त्याने त्याचे गाव जामठी असल्याचे सांगितले. शहर पोलीस पथकाने अत्यंत कसोशिने प्रयत्न करून महाराष्ट्रातील ४ ते ५ जामठी नाव असलेल्या गावांचा शोध घेवुन त्याच्या राहत्या गावाचा संपूर्ण पत्ता शोधला तेव्हा तो मध्यप्रदेश राज्यातील शहापुर हददीतील जामठी ता.जि.ब-हानपुर असा मिळून आला त्या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता ते जामठी ता.जि.ब-हानपुर येथील कोतवाल भावसिंग रुसेन चव्हाण यांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली. खामगांव शहर पोलिसांनी तात्काळ त्या मुलाच्या नातेवाईकाना मुलाबाबत माहीती देवुन आजर त्यांना पो.स्टे.शहर ला बोलाविले असता त्यांनी त्यांच्या हरविलेल्या मुलास ओळखले व अत्यंत भावुक होवुन रडायला लागले.पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकाना मुलाचे नाव,गाव विचारले असता तो पप्पु भावसिंग चव्हाण,वय-६ वर्ष रा. ग्राम जामठी ता.जि. ब-हानपुर मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे सांगितले व तो मागील काही दिवसांपासुन हरविल्याचे सांगितले.याबाबत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी सर्व शहानिशा करुन सदरबाबत वरिष्ठांना माहीती देवुन हरविलेल्या मुलगा पप्पु भावसिंग चव्हाण,क्य-६ वर्ष रा. ग्राम जामठी ता.जि.ब-हागपुर (मध्यप्रदेश राज्य) याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर कार्यवाही ही बुलडाणा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर पो.हेमराजसिह राजपुत, उपविभागीय पो.अधिकारी अमोल कोळी व शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. रणजितसिंह ठाकुर,पो.हे.कॉ.गजानन सातव ,पो.कॉ. देविदास इंगळे,पो.कॉ. संदिप टेकाडे यांनी केली आहे.