खामगांव : आज दि.६ डिसेंबर रोजी आईसाहेब मंगल कार्यालय येथे १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्या संबंधी चर्चा व मार्गदर्शन झाले.आज ६ डिसेंबर असून सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्यामुळे त्यांच्या प्रीतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.व त्यानंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली.यावेळी ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले.ह्या कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी मा. नगराध्यक्ष ठाकुर कमलसिह गौतम होते. तसेच यावेळी विश्वनाथजी झाडोकार, शिवाजीराव पाटील,दे.ला.गोतमारे सर,रमाकांतभाऊ गलांडे, देवेंद्रदादा देशमुख,आनंद तायडे,भगवान लाहुडकार सलीम खान अजय धनोकार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वाभिमान सप्ताह च्या नियोजनामध्ये “राष्ट्रवादी सेवाधारी आपल्या दारी” या अभियाना अंतर्गत शहरातील विविध प्रभागामध्ये रेशन कार्ड दुरुस्ती,नवीन रेशन कार्ड बनविणे,रेशन कार्डामध्ये नवीन नाव समाविष्ट करणे किंवा रद्द करणे.ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारापेक्षा कमी आहे अशा रेशन धारकांना धान्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.असे या अभियानाचे स्वरूप राहील. तसेच महिलांनसाठी रांगोळी स्पर्धा व युवकांसाठी स्पर्धा परिक्षेकरिता तज्ञांच्या द्वारे मार्गदर्शन व युवकांसाठी ता.रा.यु.काँ तर्फे सामाजिक प्रभोदना द्वारे शाखांचे उद्घाटन व अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच १०१ युवकांचे पक्ष प्रवेश या सप्ताह मध्ये घेण्याचा निर्धार घेण्यात आला.तसेच या सभेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून नरेंद्र पुरोहित, विकास चव्हाण,विठ्ठलराव अंभोरे,दिलीप पाटील, कायदे रहमान,सलीम खान,मंगलाताई सपकाळ,राहिना परवीन, विजय कुकरेजा,अविनाश वानखेडे,प्रशांत धोटे, सचिन ठाकरे, नरेश भारसाकळे,विजय चोपडे गजानन अढाव,अशोक बहुरूपे,अनु जोशी, आकाश गवले उपस्थित होते.यावेळी संभाजी ब्रिगेड चे शहर अध्यक्ष श्री शेट्ये यांनी आपल्या अनेक सहकार्या सोबत प्रवेश घेतला.
या कार्यक्रमाचे सुत्रचांलन आकाश खरपाडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन अँड़.विरेंद्र झाडोकार यांनी केले.
next post