November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी

कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवाला शिवीगाळ; पोलिसात तक्रार दाखल

खामगांव : येथील कृ.उ.बा.स चे सचिव मुकुटराव भिसे यांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ची तक्रार काल रात्री शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की ५ नोव्हेबर रोजी दुपारी २:१५ च्या सुमारास मी कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे माझे कार्यालयीन कामकाज करत असताना माझ्या कार्यालयात प्रवीण मोरे हा आला व मला म्हणाला की तुम्ही कापसाच्या गाड्या विना नंबरच्या कशा सोडल्या आणि मला त्याची आत्ताच माहिती द्या असे म्हणाला. त्यावर मी त्याला सांगितले की सद्या माझ्याजवळ ही माहिती उपलब्ध नाही मी तुम्हाला थोड्या वेळात माहिती मागवून देतो. त्यावर तो मला म्हणाला की तू मला आत्ताच माहिती दे स्वतःला काय समजून राहिला मी तुला पाहून घेईल असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली व मला म्हणाला की बाजार समिती वाले खूप माजले आहेत.तुला जीवाने मारून टाकेल व तुझ्यावर जातीवादी गुन्हा दाखल करतो. तसेच तुम्ही बाहेरगाव वरून येणे जाणे कसे करतात हेच पाहतो अशा धमक्या दिल्या व कार्यालयातच मला लोटपाट केली. अशी तक्रार सचिव भिसे यांनी दिली आहे. या तक्रारिवरून शहर पोलिसांनी आरोपी रवि मोरे याच्या विरुद्ध भादवि कलम ३५३,२९४,३२३, ५०४,५०६अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असूनआरोपिला रात्रिच अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे एपीआय रवींद्र लांडे करीत आहेत.

Related posts

चिखलीतील आनंद इलेक्ट्रॉनिकवर सशस्त्र दरोडा ; दुकान मालक कमलेश पोपट यांची हत्या

nirbhid swarajya

विनापरवानगी ते वृक्ष कापणारा डिजिटल फलक व्यावसायिक

nirbhid swarajya

वर्दळीच्या मार्गावर महामंडळ बसचा ब्रेक फेल मोठा अपघात टाळला…

nirbhid swarajya
error: Content is protected !!