January 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

कॅशियरकडून नोटा बदलून आणतो असे म्हणून २३ हजार लंपास केले

खामगाव : नांदुरा रोड वरील बँक ऑफ बडोदा मध्ये बाळकृष्ण प्रल्हाद गवळी रा.आवार व त्यांची पत्नी सौ.शोभा गवळी हे दोघे १ डिसेंबर रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते. प्रल्हाद गवळी यांनी बँकेतून २४ हजार रूपये काढले. कॅशियरने १०० रूपयांच्या नोटांचे दोन बंडल व ५०० रूपयांच्या ८ नोटा दिल्या. त्यामधील एक हजार रूपये पत्नी शोभा हिला दिले. त्यानंतर बँकेतील खुर्चीवर बसले होते. यावेळी अनोळखी इसमाने बँकेतील कर्मचारी असल्याची बतावणी करून कॅशियरकडून फाटलेल्या नोटा बदलून आणतो असे म्हणून २३ हजार रूपये त्यांच्याकडून घेतले. बराच वेळ तो परत न आल्यामुळे प्रल्हाद गवळी हे कॅशियरला भेटले. यावेळी कॅशियरने सांगितले की, तुमच्याकडे कोणता कर्मचारी पाठवलाच नाही. त्यामुळे प्रल्हाद गवळी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.याप्रकरणी प्रल्हाद गवळी यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात इसमाविरूध्द कलम ४२०, १७० अन्वये गुन्हा दाखल केला.

Related posts

मै सबके लिये दुवा करुंगी..

nirbhid swarajya

अनोळखी इसमाचा आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

nirbhid swarajya

माझा वाढदिवस महावितरणची सर्व कार्यालये उपकेंद्र हयांना टाळा बंद व हल्ला बोल आंदोलन करुन साजरा करा- ॲड. आकाश फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!