November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शेतकरी

आत्मक्लेश जागर आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनो सहभागी व्हाव्हे- श्याम अवथळे

खामगाव : दिल्लीत गेल्या सात दिवसापासून शेतकरी आंदोलन करताय.नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी आहे.त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.या मागण्यांसाठी हे आंदोलन होतंय.या शेतकऱ्यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभर राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर लोकशाही, व शांततेच्या मार्गाने बसून आत्मक्लेश करणार आहे. त्याचाच भाग म्हणून खामगाव येथील मा. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर देखील सायंकाळी 6 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी रात्रभर भजन-कीर्तन करून जागर करणार आहे. सगळे कार्यकर्ते भाकरी चटणी सोबत घेऊन येऊन तिथेच जेवण करतील.व संपूर्ण रात्र तिथेच घालवणार आहे.या आंदोलनात कलावंत देखील येऊन पाठिंबा देणार आहे.तरी यात शेतकऱ्यांनी हजारो च्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी केले आहे.

Related posts

गावठी दारू विक्रेत्यांविरूध्द कारवाई

nirbhid swarajya

रक्तदानाच्या माध्यमातून सर्वधर्म जोपासण्याचा उपक्रम अभिनंदनीय- मा.आ.राणा दिलीपकुमार सानंदा

nirbhid swarajya

अवकाळीने घेतला निष्पाप बालिकेचा बळी! भिंत कोसळून दगावली!!

nirbhid swarajya
error: Content is protected !!