October 6, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ विविध लेख

विदर्भस्तरीय दीपावली साहित्य काव्यमहोत्सव संपन्न

खामगांव : आम्ही लेखिका संस्था ,विदर्भ यांच्यावतीने विदर्भस्तरीय दीपावली कविसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दिनांक 19 नोव्हे.ते 29 नोव्हेंबर 2020 या अकरा दिवसांमध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये दररोज ऑनलाईन गुगल मीट वर कवयित्रीचे कवी संमेलन संपन्न होत आहे. विदर्भ प्रमुख प्रा.विजया मारोतकर यांच्या संकल्पनेतून हे आयोजन करण्यात आलेले आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या कानाकोपऱ्यातील दुर्लक्षित लेखिका आणि कवयित्री यांना एकत्रित करून त्यांच्या अंतर्गत लेखन कौशल्याला वाव मिळावा या दृष्टिकोनातून ‘आम्ही लेखिका’ या संस्थेच्या कविसंमेलनात कवयीत्री सहभागी व्हाव्यात हा, या आयोजना मागचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार हे आयोजन करण्यात आलेले आहे.दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेमध्ये ‘आम्ही लेखिका बुलढाणा’ च्या कार्यकारिणी द्वारे साहित्य दिवाळी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष कवयित्री लीना भुसारी चंद्रपूर व प्रमुख अतिथी कवयित्री मंगला डहाके भंडारा यांच्या हस्ते साहित्य दिवाळी कविसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कवयित्री वैशाली तायडे यांनी आपल्या सुमधुर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले व कवयित्री ऊर्मिला ठाकरे यांनी सावित्री वंदना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुलढाणा जिल्ह्याच्या आम्ही लेखिका च्या अध्यक्ष कवयित्री निताताई बोबडे यांनी केले.यावेळी विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या विदर्भ प्रमुख कवयित्री विजयाताई मारोतकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण कवयित्रींनी ‘आम्ही लेखिका बुलढाणा’ या समूहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमांमध्ये फक्‍त बुलढाणा जिल्ह्याच्याच एकूण 22 कवयित्रींनी सहभाग नोंदवला असून इतरही कवयित्रींनी आपल्या कवितांचे उत्कृष्ट सादरीकरण करून तब्बल तीन तास या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री राधिका देशपांडे यांनी केले तर आभार कवयित्री अश्विनी घुले यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमांमध्ये विविध आशयाच्या कविता सादर करण्यात आल्या त्यामध्ये मुख्य आकर्षण ग्रामीण कवयित्री माया ताई चव्हाण यांची कविता ‘मी गेल्यावर’ तसेच नागपूरच्या गझल नंदा सुनंदाताई पाटील यांची गझल कार्यक्रमाची वैशिष्ट्य ठरली. तसेच इतर अनेक कवयित्रींनी विविध आशयाच्या कविता सादर केल्या. यामध्ये प्रामुख्याने सुरेखा खोत, बुलढाणा मीनाताई फाटे नांदुरा, शिल्पा चव्हाण खामगाव,जयश्री कविमंडन मेहकर,पद्मजा अहिर, बुलडाणा, कुंदा महाजन चिखली,जया सूर्यवंशी शिर्के,बुलडाणा,वंदना सुरंगळीकर,बुलडाणा, सरिता बायकर ,अलका धाडे सपकाळ खामगाव, दिपाली पाटील बुलडाणा,अर्चना देव, मनीषा राऊत, सुवर्णा पावडे चिखली, सूनिता चौखट इतर अनेक निमंत्रित कवयित्रींनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून नवीन कार्यकारिणीचे सर्व जिल्हाध्यक्षांनी अभिनंदन केले.यावेळी मोहन कुलकर्णी यांना या कार्यक्रमांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये माँ जिजाऊ साठी प्रसिद्ध आहे, त्यांचा आदर्श घेत साहित्यिकांनी समोर यावे व अकरा ही जिल्ह्यांना सामावून घेत ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करणे ही कठीण गोष्ट आहे परंतु विजया मारोतकर त्यांच्या कल्पकतेने हे सहज साध्य झालेले आहे.बंद दारा मागे असलेल्या कितितरी लिहिनाऱ्या अशा महिला ज्यानी 2/4 च कविता, एखादी च कथा,एखाद, दुसरा लेख अस थोडफार लिखाण केलेल आहे.अशा लेखिकांच्या लेखणीचे बळ वाढावं या उद्देशाने स्व.मोहन कुलकर्णी यांनी’आम्ही लेखिका’ ची स्थापन केली.या संस्थेचं हे कार्य सुरु रहाव ,या दृष्टी कोनातून या काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये विदर्भस्तरा वरून अनेक लेखिका/कवयित्री श्रोता उपस्थीत होत्या.

Related posts

अखिल भारतीय मराठा महासंघ खामगांव शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर 

nirbhid swarajya

बाजार समितीतील संभाव्य प्रशासकांची यादी जाहीर

nirbhid swarajya

गजानन महाराज संस्थानतर्फे आयसोलेशनाठी ५०० खाटांची व्यवस्था

nirbhid swarajya
error: Content is protected !!