January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा

अखेर अग्रवाल फटाखा केंद्राचा परवाना रद्द

फटाक्यांचा साठा तात्काळ जप्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

खामगांव : शहरातील गोपाल बाबूलाल अग्रवाल यांच्या शिरजगाव देशमुख येथील अग्रवाल फटाका केंद्राचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच परवाना रद्द केल्याचा आदेश नुकताच जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी दिला आहे. गोदामासाठी अकृषिक वापर असलेल्या जमिनीचा वापर तसेच महामार्गापासून ठरलेल्या अंतराचे पालन न करणे यासह विविध कारणांसाठी सदरची कारवाई करण्यात आली आहे. खामगाव शहरातील होलसेल व किरकोळ फटाका विक्री परवाना धारक गोपाल अग्रवाल व कविता सुनील अग्रवाल यांनी बनावट कागदपत्राद्वारे नाहरकत प्रमाणपत्र व परवाना रद्द करण्यात यावी अशी तक्रार येथील सुप्रसिद्ध अॅड.नरेंद्र जोशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून अग्रवाल यांची शिरसगाव देशमुख येथील गोदामासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती,तसेच ले-आउट ही तयार केले नसल्याचे उघड झाले.फटाका गोदाम खामगाव-बुलढाणा महामार्गाच्या केवळ ४८.८ मीटर अंतरावर बांधण्यात आले आहे. या सर्व प्रकारात शासनाचे सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली, तसेच नाहरकत व परवाना मिळण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचेही सिद्ध झाले आहे. फटाका बांधकाम करताना नाहरकत मिळण्यासाठी दाखल कागदपत्रावर गोदाम रस्त्यावरून १ किलोमीटरवर असल्याचे नमूद केले होते. भूमिअभिलेख विभागाच्या चौकशी नुसार गोदामाचे अंतर ४८.८ मीटर एवढी असल्याचे स्पष्ट झाले. शिरसगाव देशमुख ग्रामपंचायतीने ही फटका गोदाम बांधकाम विरोधात ठराव घेतला होता त्यालाही न जुमानता बांधकाम केले आहे.स्फोटक नियमाच्या तरतुदीनुसार गोदामाच्या चारही बाजूने सुरक्षित अंतर ७१ मीटर असणे बंधनकारक आहे.मात्र हे सुद्धा पाळण्यात आले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या जीवाशी अनेक वर्षांपासून खेळ सुरू होता. या संपूर्ण प्रकरणात तातडीने कारवाई करावी परवाना रद्द करावा फटाक्यांचा साठा जप्त करावा असे आदेश जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी दिला आहे.तसेच खोटे बनावट कागदपत्रे दाखल करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी विनंती सुद्धा जिल्हाधिकारी यांना करणार आहे.तसेच या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा सुद्धा करणार असल्याचेही अॅड.नरेंद्र जोशी यांनी सांगितले आहे.

Related posts

वाढदिवसानिमित्य जिजाऊ सृष्टी विकासकामाकरिता एक लाखांची देणगी

nirbhid swarajya

सोयाबीन बियाण्यांचे बोनस शेतकऱ्यांना तातडीने द्या- भाजप किसान आघाडीचे निवेदन

nirbhid swarajya

खामगाव सिलिंडरच्या ट्रकला धडक दिल्याने भरवस्तीत गॅस गळती…

nirbhid swarajya
error: Content is protected !!